अमळनेर: पिंपळे खुर्द शिवारातून शेतातून बैलजोडी आणि गायची चोरी; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द शिवारातील शेतातून बैलजोडी आणि गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याबाबत सोमवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.