कळमेश्वर: कळमेश्वर एमआयडीसी येथे शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी जाणून घेतल्या कामगारांच्या समस्या
आज रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कळमेश्वर एमआयडीसी येथे शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांना दिवाळी हा सण येऊन देखील त्यांचा पगार मिळालेला नाही. आणि ठेकेदार मनमानी करत आहे अशी माहिती मिळाल्यावर शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी लवकरात लवकर पगार व्हावा अशी मागणी केली