कुही: सालई- गोधनी शिवारात दुचाकी स्लीप होऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू
Kuhi, Nagpur | Sep 24, 2025 पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या सालई गोधनी शिवारात रस्त्या वरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वेगात असलेली मोटारसायकल स्लीप झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक तरुणाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली.अरमान महेश निकुसे वय 23 राहणार नागपूर असे मुतकाचे नाव आहे. मृतक हा मोहजरी जिल्हा बालाघाट येथील मुळचा रहिवासी असून मजुरी करून उदरनिर्वाह करायचा, याप्रसंगी कूही पोलीसात अकस्मात मृत्यू ची नोंद केली असून तपास कूही पोलीस करीत आहेत.