सेलू तालुक्यातील केळझर गावात रविवारी घरासमोरून बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय आर्यन किशोर बावणे या चिमुकल्याचा मृतदेह बुधवारी (दि. १७ डिसेंबरला) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास केळझर परिसरातील तलावात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.