आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एकाच वेळी कारवाई करून घरफोडी, चोरी, वाहनचोरी आणि शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या २१९ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यांच्या हालचालींवर प्रभावी नजर ठेवण्यासाठी विशेष ‘इंटरोगेशन रिपोर्ट’ फॉर्म तयार करण्यात आला असून, निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी ही महत्त्वाची प्रतिबंधात्मक मोहिम राबवण्यात आली आहे.