चंद्रपूर: बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित होऊ घातलेले टपाल तिकिटसाठी आ. मुनगंटीवार यांचे निवेदन
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र, राज्यसभेचे माजी उपसभापती आणि आंबेडकरी चळवळीचे महान नेतृत्व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित होऊ घातलेले टपाल तिकिट ही सर्वांसाठी एक अभिमानाची बाब आहे. यासाठी लागणारा रू. 12,00,000/- चा भरणा सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून डाक विभागाला करण्याबाबतचे निवेदन आज मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांना मुंबई येथील प्रशासकीय भवन येथे दिले.