हिंगणघाट: नगरपालिका निवडणुकीची तयारी पूर्ण: १० नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज २डिसेंबरला मतदान:निवडणूक अधिकारी अवतरे
हिंगणघाट नगरपालिका निवडणुकीसाठीची प्रक्रिया वेगात सुरू झाली असून निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी निवडणुकीची सविस्तर माहिती दिली. नामनिर्देशन प्रक्रिया १७ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार असून अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल करावे लागणार आहे . उमेदवारांनी अर्जाची मूळ प्रत कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन करताना जास्तीत जास्त पाच जणांना कार्यालयात प्रवेशाची परवानगी राहील