जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेले शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला बुधवार दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट दिली. दरम्यान भेट देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना संबंधित अधिकार्यांना दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र पाटील, शासकीय नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज देशमुख यांची उपस्थिती होती.