इंदापूर: क्रीडा आणि अल्पसंख्याक खातं चांगलं होतं, त्रास नव्हता; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी या विधानानंतर लगेचच केली सारवासारव..
Indapur, Pune | Aug 17, 2025 कोकाटे हे रम्मी खेळत असल्याच्या व्हिडीओमुळे अडचणीत आल्यानंतर त्यांच्याकडचं कृषी खातं दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आलं. तर भरणेंकडं असणारं क्रीडा खातं कोकाटेंना सोपवलं गेलं.मात्र दत्तात्रय भरणेंना आता कृषी खात्याचा भार सोसवेना झालाय. इंदापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना क्रीडा व अल्पसंख्यांक खात्यचं बरं होतं, लय त्रास नव्हता असं विधान त्यांनी केलंय.