चिमूर: शिरपूर येथील सावरबोडींची पार फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान
चिमूर नेरी इथून जवळच असलेल्या शिरपूर येथील सावरबोडींची पार फुटल्याने पाण्याच्या प्रवाहाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले महसूल विभागाने तात्काळ नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी व पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाने 14 सप्टेंबर रोज रविवारला दुपारी एक वाजता च्या दरम्यान चिमूर तहसीलदार यांच्याकडे केली.