शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील प्रायमरी शाळेजवळील ‘जन्नत पान सेंटर’ या पानठेल्यावर धाड घालून पोलिसांनी दोन सिगारेट, तंबाखूच्या सात पुड्या, बिडी पाकीट जप्त केले. गुरुवारी (दि.१५) सायंकाळी ६ वाजता दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक संजय तुपे, हवालदार राजेश हुकरे, शिपाई कापसे, शिपाई मदारकर यांनी ही कारवाई केली. प्रकरणी इरफान शेख सलावुद्दीन शेख (३२, रा. सिव्हिल लाईन) याच्यावर कलम ६(अ), २४ सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अंतर्गत गुन्हा न