ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रणजित यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून आज १८ डिसेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास कार्यालयीन वेळेत अधिकृतरीत्या त्यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रोहन घुगे यांची बदली जिल्हाधिकारी, जळगाव या पदावर करण्यात आली होती.