यवतमाळ: जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानात मोलाचे योगदान देणारे विचारवंत, झुंझार पत्रकार आणि साहित्यिक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.