बोदवड शहरात कुरेशी मोहल्ला आहे. येथील रहिवाशी शबाना बी इलियाज कुरेशी वय ३० ही विवाहिता तिच्यासोबत तिची मुलगी अश्मिरा कुरेशी वय ८ हिला सोबत घेऊन घरी सांगून गेली की मी उजनी येथील दर्गाह वर दर्शनासाठी जात आहे. असे सांगून घरून निघालेली विवाहिता आणि मुलगी घरी परत आले नाही. तेव्हा याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.