निलंगा: श्रीराम मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली. श्रीराम भक्त भावूक.. पुनर्निर्माणाचा केला मनोदय व्यक्त
Nilanga, Latur | Sep 28, 2025 श्रीराममंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाची भिंत कालच्या अतिवृष्टीच्या पावसाने कोसळली. निलंगा येथील हा समर्थ सांप्रदायाचा वर्ष १६५० च्या सुमारे स्थापन झालेला मठ आहे.स्वतः समर्थ रामदास स्वामी यांनी निलंगा येथे स्वतः येऊन बत्तीस शिराळा येथील आपले शिष्य आनंद स्वामी यांची मठपती म्हणून नेमणूक केली होती.तेव्हापासून रामदासी कुटुंबाची परंपरा श्रीरामाच्या सेवेत आहे.