धुळे: वाडी भोकर रोड परिसरात दुचाकी चोरीचा थरार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
Dhule, Dhule | Oct 20, 2025 धुळे शहरातील वाडी भोकर रोड परिसरातील दुचाकी चोरीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात एक सराईत चोरटा अत्यंत शिताफीने दुचाकी चोरताना दिसतो. चोरीपूर्वी त्याने परिसराची पाहणी करून योग्य संधी साधली आणि क्षणात दुचाकी घेऊन पसार झाला. हा प्रकार शेजारील दुकानाच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सणासुदीच्या काळात अशा चोरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.