आज दिनांक 27 ऑक्टोबर 2025 वार सोमवार रोजी रात्री 8 वाजता भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीत तळेगाव येथे तळेगाव ते फुलंब्री या मुख्य रोडवर अवैध दारू विक्री अड्ड्यावर व जुगार खेळणाऱ्या इसामानवर असणारा पोलिसांनी छापा टाकत 9जणांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून काही देशी दारूच्या बाटल्या व दुचाकी तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण 2 लाख 3 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे,सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संतोष आहिरे यांच्या पथकाने केली आहे.