मेहकर: स्त्रीशक्ती ही नवनिर्मितीचे प्रतीक मेहकर चे आमदार सिद्धार्थ खरात यांची विधानभवनात प्रतिक्रिया
७ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आमदार सिद्धार्थ खरात यांनी सभागृहात समस्त माता भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.स्त्री ही नवनिर्मितीच प्रतीक तर आहेच परंतु शेती, धर्म सुधारणा आणि कुटुंबव्यवस्था मजबूत करण्यासाठी स्त्रियांचं खूप मोठं योगदान आहे. अगदी याची उदाहरण माता रमाई, भिमाई,अहिल्यादेवी, राष्ट्रमाता जिजाऊ, या थोर स्त्रियांचा राष्ट्र घडवण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. असे प्रतिपादन सभागृहात सिद्धार्थ खरात यांनी केले.