म्हसळा: म्हसळा तालुक्यातील मौजे पानवे येथे म्हसळा तालुका कुणबी समाज पश्चिम विभाग मध्यवर्ती सामाजिक सभागृहाचे लोकार्पण
Mhasla, Raigad | Sep 28, 2025 आज रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास म्हसळा तालुक्यातील मौजे पानवे येथे म्हसळा तालुका कुणबी समाज पश्चिम विभाग मध्यवर्ती सामाजिक सभागृहाचे लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले. हा सामाजिक सभागृह कुणबी समाजाच्या संघटन, ऐक्य व सामाजिक उन्नतीचे प्रतीक ठरेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. या सभागृहाच्या माध्यमातून समाजातील विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, सामुदायिक चर्चा आणि विकासाभिमुख बैठकांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल अशी माझी अपेक्षा आहे.