सातारा: तेरा वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याप्रकरणी पंढरपूर येथील चौघांवर पॉक्सोचा गुन्हा दाखल
Satara, Satara | Nov 28, 2025 सातारा तालुक्यातील एका गावातून एका महिलेला व तिच्या दोन मुलांना पंढरपूर येथील राहणाऱ्या चौघांनी चार चाकी वाहनातून, मुलाला जीवे मारण्याची धमकी देत गाडीत बसून घेऊन गेले, यावेळी तेरा वर्षाच्या मुलीला मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, व पंढरपूर येथील कासेगाव येथे मुलाला व महिला त्या ठिकाणी सोडून तेरा वर्षाच्या मुलीला घेऊन गेले, तिचा आजपर्यंत शोध लागला नाही, ही घटना दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.