मागील काही दिवसांपासून रामटेक क्षेत्रासह संपूर्ण विदर्भात वाघ, बिबट या हिंस्र प्राण्यांनी हौदोस घालून नरबळी व पशुबळी घेतले आहेत. अशातच पर्यटक मित्र तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना यावर उपाय योजना संबंधी निवेदन दिले. ही माहिती त्यांनी मंगळवार दिनांक 16 डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान प्रसारमाध्यमांना दिली.