नांदेड: पंचायत समितीच्या हलगर्जीपणामुळे इंजेगाव येथील जलतारा काम रखडले;कलेक्टरांच्या आदेशाला केराची टोपली: सरपंच मुक्ताई पंचलिगी
Nanded, Nanded | Nov 26, 2025 आज बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी सव्वा दहा वाजताच्या दरम्यान इंजेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील महिला सरपंच मुक्ताई नागनाथ पंचलिगी यांनी इंजेगाव येथे प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, नांदेड पंचायत समिती कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे इंजेगाव येथील जलतारा काम रखडले असुन पीटिओ, एपीओ, बिडीओ आणि कलेक्टरांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आल्याची सविस्तर माहिती आज सकाळी महिला सरपंच मुक्ताई नागनाथ पंचलिगी यांनी माध्यमांना दिली आहे.