भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सेलू तालुक्यात देशभक्तीच्या जयघोषात, उत्साह आणि थाटात साजरा करण्यात आला. तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था तसेच विविध संघटनांच्या वतीने सकाळपासूनच ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ९.१५ वाजता तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले