छत्रपती शिवराय कबड्डी मंडळ व नवयुवक आदिवासी मंडळ, गंगुटोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय भव्य ओपन पुरुष “गंगुटोला कबड्डीचा महासंग्राम” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मातीवर खेळल्या जाणाऱ्या या कबड्डीच्या प्रत्येक झेपेत शिस्त, जिद्द आणि संघभावनेचा आत्मा दिसून आला.ग्रामीण युवकांच्या ताकदीला योग्य व्यासपीठ मिळाले, हीच या स्पर्धेची खरी ओळख आहे.खेळातून घडणारी सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असून आहे. अशी मत आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केले.