वाशिम: मुख्यमंत्री साहेब नेहमी वाशीम शहराला भेट द्या - आपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सागर कोकास यांची उपहासात्मक मागणी
Washim, Washim | Nov 28, 2025 वाशिम शहरामध्ये दिनांक 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाशिम दौऱ्यावर आले असता सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील सिविल लाईन परिसरातील मुख्य रस्ता दोन तासांमध्ये नवा केला. सदर खात्याची ही तत्परता पाहता आम आदमी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सागर कोकास यांनी मुख्यमंत्र्याकडे उपहासात्मक मागणी केली.