उत्तर सोलापूर: भाजपचे आमदार नितेश राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा सात रस्ता येथे जाळला
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एका कार्यक्रमांमध्ये मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले त्यामुळे राज्यभरात मुस्लिम बांधव तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान आज मंगळवारी संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूर शहरातील सात रस्ता येथे भाजपचे आमदार नितेश राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदवण्यात आला. या राणेंचं करायचं काय ,खाली मुंडकं वर पाय, राणे यांचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.