तळेगाव दशासर पोलीस स्टेशनला बाळापूर (जि. अकोला) येथून रेशनचा तांदूळ घेऊन एक ट्रक समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे ठाणेदार किरण औटे यांनी तात्काळ पोलीस पथक समृद्धी महामार्गावर गस्तीकरिता रवाना केले.गस्ती दरम्यान संशयित ट्रक क्रमांक MH 40 CM 8281 नागपूरकडे जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रक थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याने तांदळाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतले.