गोसेखुर्द धरण प्रकल्पातील विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शासनाकडून वारंवार मिळत असलेल्या खोट्या आश्वासनांना आणि सततच्या दिरंगाईला वैतागून, प्रकल्पग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यानुसार १२ डिसेंबरला दु. १२ वा. भंडारा जवळील वैनगंगा नदीवरील कारधा लहान पुलाजवळ सर्व प्रकल्पग्रस्त विधिवत जलसमाधी घेणार असल्याचा गंभीर इशारा ११ डिसेंबरला दु. ३.३० वा. देण्यात आला आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत...