नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका २९ वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परशुराम मोतीलाल गौर वय २९ वर्ष राहणार एकुनाद खुर्द, बेलाघाट, उत्तर प्रदेश असे मृत मजुराचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन येथील एनआयटीसीच्या बंद असलेल्या पडोलिया बिल्डिंगसमोर शैलेंद्र शर्मा यांची कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे. मृत परशुराम हा याच ठिकाणी मजुरीचे काम करायचा आणि तेथील एका खोलीत राहायचा.