वाशिम: कारंजात दोन लाख 36 हजाराचे मेफेड्रोन जप्त, शहर पोलिसांची धडक कारवाई
Washim, Washim | Oct 5, 2025 कारंजा येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करून स्थानिक रिलायन्स पेट्रोल पंप बायपास ते प्राप्ती हॉटेल दरम्यान दोन लाख 36 हजार रुपयांचे मेफेड्रोन एमडी हा रासायनिक अमली पदार्थ जप्त करून दोन जणांना बेड्या खोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण 7 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी दिली. एम एच 37 व्ही 777 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारसह हाशिम उर्फ आरिफ खान आसिफ खान वय 32 फारुख कॉलनी व अनिस खान सत्तार खान वय 52 रा. मजीतपुरा दोघे रा कारंजा अटक केली