मौदा: तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप आकरे यांची निहारवानी येथे निवड
Mauda, Nagpur | Sep 16, 2025 ग्रामीण भागात असलेल्या निहारवानी येथे ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप आकरे यांची निवड करण्यात आली.याबाबतचे वृत्त असे की ग्रामपंचायत च्या वतीने निहारवानी येथे ग्रामसभा घेण्यात आली. सदर ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपदी प्रदीप आकरे यांची निवड करण्यात आली. आकरे यांची निवड झाल्याने त्यांचे गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी गावातील पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.