कोरपना: काँग्रेस शिवसेना( उ बा टा) वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा गडचंदूर पत्रकार परिषदेमध्ये
कोरपणा गडचंदुर नगरपरिषद निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकजुटींचा निर्धार व्यक्त करत लोकाभिमुख विकास साठी एकत्र लढण्याचा संकल्प केला आहेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम पेचे आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार मधुकर सोनारकर यांनी गडचंदूर येथे 8 नोव्हेंबर रोज शनिवारला दुपारी चार वाजता आजच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन या युतीची औपचारिक घोषणा केली.