यवतमाळ: शेतीच्या वादातून एकाची दगडाने ठेऊन ठेचून हत्या,आरोपी वडगाव जंगल पोलिसांच्या ताब्यात
शेतीच्या वादातून एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याचा दगडाने ठेचून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना वडगाव जंगल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलोरी येथे घडली.श्रीराम लक्ष्मण सुरपाम असे मृता शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव जंगल पोलिसांनी काही तासातच मुख्य आरोपी संभा गाडेकर यांना अटक केली आहे.