रूई खैरी येथील ३० वर्षीय तरुण मंगेश दादाराव करलुके याने गळफास लावून आत्महत्या केली. दोन वर्षांपूर्वीच विवाह झालेल्या मंगेशने सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील आकाशवाणी केंद्राच्या मोकळ्या जागेत झाडाला फास लावून आपली जीवनयात्रा संपवली.मंगेश रविवारी घराबाहेर पडला होता आणि रात्री उशिरापर्यंत घरी परतला नव्हता.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक कलह की मानसिक तणाव, या दिशेने बुटीबोरी पोलीस अधिक तपास करत आहेत.