समुद्रपूर: गिरड येथील वनविभागाच्या मिशन टायगर मोहिमेत पावसाचे व्यत्यय:५० च्यावर कर्मचारी अधिकारी वाघाच्या मार्गावर
गिरड खुर्सापार परीसरात एक वाघीण तिचे तिनं बच्छडे व एक वाघ अश्या ५ वांघानी शेतीशिरात मुक्त संचार सुरू केल्याने शेतकरी ,शेतमजूर व नागरीकांमध्ये चांगली दहशत निर्माण केली आहे.यातील एका वाघाला जेरबंद करण्याची परवानगी वनविभागाला मिळाली आहे.यामुळे या वाघाला जेरबंद करण्याच्या वनविभागाच्या वतीने युद्धात पातळीवर पर्यंत सुरू असले तरी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व्यत्यय येत आहे. या वाघाच्या मार्गावर उपवनसंरक्षक हरबिदर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात मिशन सुरू आहे