पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या रामटेक - खिंडसी मार्गावरील नागार्जुन परिसरात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी वरील पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक 9 डिसेंबर च्या रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली.ही माहिती रामटेक पोलिसांनी दहा डिसेंबरला सायंकाळी सात वाजता च्या दरम्यान प्रसार माध्यमांना दिली.