खेड: खेड मधील वासुली फाटा येथे तरुणावर कोयत्याने वार
जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना खेड मधील वासुली फाटा येथे घडली. ओंकार परमेश्वर शिवले (१९, वाळुंज वस्ती, खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी त्यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भागवत लक्ष्मण ठोंबरे (१८, कडूस, खेड), योगेश विक्रम साळवे (१९, करंज विहिरे, खेड) या दोघांना अटक केली आहे