शनिशिंगणापूर देवस्थानच्या अॅप घोटाळ्याप्रकरणी अखेर सायबर पोलिसांनी कारवाई करत देवस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांना गुरूवार ४ डिसेंबर रात्री अटक केली. अॅप घोटाळ्याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो तपासासाठी येथील सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. चार बेकायदेशीर अॅप आढळून आले आहेत.