महाराष्ट्रात 2012 पासून गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखूवर बंदी आहे. पोलीसांनी कारवाई करून गुटखा वगैरे पकडला आणि त्याचे नमुने एफडीए च्या प्रयोगशाळेत पाठवले तर ते "तपासू नका, उलट पोलीसांवरच गुन्हे दाखल करा", असा शासनविरोधी आदेश एफडीए च्या सहआयुक्तांनी काढला आणि हा आदेश सहसंचालक एफडीए छत्रपती संभाजीनगर यांना पाठवला आहे. तसेच नियम डावलून अधिकारी पदावर आहे.असे असतानाशासनविरोधी बेकायदेशीर आदेश देणार्या अधिकार्यावर निलंबनाची कारवाई करणार का? असा स्पष्ट प्रश्न आ.महाले यांनी विधानभवनात केला