राजकारणात अनेक चढउतार पाहिले आहेत. लोकसभेत चांगले काम असतानाही आधी आजी, मग माजी झालो. मात्र प्रत्येक प्रसंगात मी संधी शोधली, कधीही मोकळा बसलो नाही, असे सांगत माजी खासदार सुजय विखे यांनी आपल्या खास शैलीतून विरोधकांचा समाचार घेतला.“माझ्यासारख्या माणसाला मोकळं बसू देऊ नका, कारण त्याचे परिणाम वाईट होतात. ज्यांनी मला घरी बसवलं, त्यांनाही नंतर मोकळ व्हावं लागलं,” असा टोला त्यांनी यावेळी लगावला. आज शनिवारी सायंकाळी ब्राह्मणी येथे आयोजित कार्यक्रमात माजी खासदार सुजय विखे बोलत होते.