उदगीर शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी १९ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी मोठया उत्साहात आपापल्या शेतात दर्श वेळ अमावस्या साजरी केली,लक्ष्मी पूजन करून पांडवांना नैवेद्य दाखवून दर्श वेळ अमावस्या साजरी केली,उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे शेतकऱ्यांनी दर्श वेळ अमावस्या साजरी करून संध्याकाळी घरी परतल्यावर रात्री १० वाजता गावातील हनुमान मंदिरासमोर हेंडगा पेटवला, हेंडगा पेटवल्याने या हेंडग्याने थंडीचा कडाका कमी होतो अशी प्रथा असल्याने गावातील तरुण शेतकरी,व नागरिकांनी हेंडगा पटविला.