चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी ३०,००० रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.
जिल्हा पुर्नवसन कार्यालय, प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांनी ३०,०००/- रूपये लाच रक्कम मागणी करून स्विकारल्याने अॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने आज दि. २८/०९/२०२५ रोजी कार्यवाही केली. यातील तकारवार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांच्या आईची मौजा चारगांव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथील घर व खुली जागा औष्णीक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे गेलेली असल्याने सदर मालमत्तेवर तकारदार यांचे मुलीचे नांव प्रकल्पग्रस्त म्हणून चढवायचे होते.