राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी शिवारात विजय शंकर हापसे या शेतकऱ्याच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी घरात घुसून मुद्देमाल लांबवण्याचा प्रयत्न केला असून, घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला असून, फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही (तांत्रिक पथक) घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.