शहरातील एका अल्पवयीन मुलाला तू सोन्याची स्मगलिंग करतो तुझ्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करून अल्पवयीन मुलाची फसवणूक केल्याची घटना जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन कुंभार दिली.