जानोरी येथील माणिक घुमरे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये नंदू कश्यप हॆ अनेक दिवसापासून भंगार व बॉक्सचा व्यवसाय करीत होते परंतु आज पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली ही आग अतिशय भीषण होती की दुकानातील सर्व वस्तू व बॉक्स जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी एच ए एल व ओझर नगर परिषदेची अग्निशामक दलाने आग नियंत्रात आणली. यात सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. .