नेवासा शहरातील श्री खोलेश्र्वर गणपती मंदिरात प्रचाराचा शुभारंभ माजी खासदार सुजय विखे पाटील,आमदार विठ्ठलराव लंघे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ करणसिंह घुले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर नेवासा शहरातून प्रचार रैली काढण्यात आली, निघालेल्या प्रचार रॅलीला महिलांची संख्या लक्षणीय होती.