अहेरी: 'हा खड्डा नाही, यमराजाचं बोलावणं आहे'; गडअहेरी येथे नागरिकांचे अनोखे आंदोलन
अहेरी-गडअहेरी मुख्य रस्त्यावर, मुरूम खदानजवळ, रस्त्याचा काही भाग पाण्यामुळे वाहून गेल्याने एक मोठा खड्डा पडला आहे. हा रस्ता केवळ आठ महिन्यांपूर्वीच तयार झाला होता, त्यामुळे कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या खड्ड्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी किंवा सामान्य जनतेचेही लक्ष नाही. यामुळे कोणाचा तरी जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल संतप्त नागरिकांनी विचारला आहे.