डहाणू: कासा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त करण्यात आले आयोजन
Dahanu, Palghar | Apr 14, 2024 डहाणू तालुक्यातील कासा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजन करण्यात आले. सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने हे शिबिर कासा येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरात नागरिकांची ब्लड, शुगर, ईसीजी, ब्लड प्रेशर, आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आली. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग्य या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.