अंबरनाथ: बदलापूर येथील स्वातंत्रवीर सावरकर उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद
आज ठाणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. पावसामुळे सर्वाधिक फटका हा ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहराला बसला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बदलापूर येथील स्वातंत्रवीर सावरकर उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 च्या सुमारास बंद करण्यात आला आहे. तसेच कामाशिवाय घराबाहेर नागरिकांनी पडू नये असे आवाहन प्रशासनाने केलं आहे.