लाखांदूर: पावसाने लाखांदूर सह तालुक्याला झोडपले; शेतकऱ्यांची धान पिकाची नुकसान होण्याची शक्यता
मागील दोन दिवसापासून लाखांदूर सह तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार झोडपल्यामुळे व तारीख 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाला आहे. तर कमी दिवसात निघणाऱ्या हलके धान हे कापणीच्या अवस्थेत आल्यामुळे अशातच पाऊस हा सतत दोन दिवस लागून पडल्याने सदर धानाची कापणी करताना अधिक प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे